सावंतवाडी : तालुक्यातील आरोस – दांडेली येथील माऊली कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, माऊली महिला मंडळ शिरोडा, अध्यक्षा श्रीम. रेखाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने, देवी सरस्वती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी आजगाव सरपंच सौ. यशश्री सौदागर, श्रीम. सुमेधा गाडगीळ, श्रद्धा कदम यांचा या महिला दिनी सन्मान करण्यात आला.
आजगाव सरपंच सौ .यशश्री सौदागर यांनी विविध सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध पदे भूषवित आहेत.समाजपयोगी काम करत आहेत. श्रीम. सुमेधा गाडगीळ यांनी मुलींना शिवणकाम शिकवून रोजगार उपलब्ध करून , स्वतःच्या पायावर उभे केले. तर श्रद्धा कदम यांनी सुद्धा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असून ,समाजसेवा करत आहेत.अशा समाजसेवेचे व्रत घेतलेल्या महिलांचा महिलादिनी सन्मान झाल्याने त्यांची प्रेरणा इतरांनी सुद्धा घ्यावी असे आवाहन श्रीम. रेखाताई गायकवाड यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर माऊली महिला मंडळ शिरोडा अध्यक्षा श्रीम. रेखाताई गायकवाड, सौ.यशश्री सौदागर सरपंच आजगाव, सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. सुमेधा गाडगीळ , दांडेली सरपंच निलेश आरोलकर, ग्रामसेवक श्रीधर राऊळ , पिंटू नाईक ,माऊली महिला मंडळाचे सचिव सौ स्मिता गायकवाड, माऊली महिला मंडळ सदस्या शिवचरण मॅडम , श्रद्धा कदम, कुडतरकर मॅडम ,बचत गट प्रभाग संघ व्यवस्थापक प्रचिती मडुरकर तसेच माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उकरंडे सर , माऊली मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक श्री रुपेश सावंत उपस्थित होते.
कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना सौ.सौदागर मॅडम सांगितले की,शासनाने भौगोलिक परिस्थिती पाहून महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक आहे.,सध्या शाळेच्या पटसंख्या या सांभाळणे कठीण झाले आहे. शासनाने इतर सर्वसाधारण शाळा सारखे ,या मतिमंद – कर्णबधिर शाळेला कडक निकष न लावता अशा प्रकारच्या शाळांना या कडक निकषातून वगळून शाळेच्या मुलांच्या प्रगतीसाठी मदत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशा मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहतील यासाठी शासनाने , समाजातील प्रत्येकाने मदत करणे गरजेचे असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक स्त्रीला देवाने बुद्धी दिली आहे त्या बुद्धीचा योग्य असा वापर करून स्त्रीने आपली प्रगती व आपल्याबरोबर समाजातील इतर घटकांची प्रगती साधन आवश्यक असल्याचे सांगून मतिमंद,कर्णबधिर मुलांना ,शाळेला मदत करण्याचे आवाहन केले. श्रीम् रेखाताई गायकवाड या अशा घटकांच्या शाळा टिकविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असून त्यांची या मुलांसाठी ,शाळेतील शिक्षकांसाठी ,त्यांच्या हक्कांसाठी सतत तळमळीने काम करत असून त्यांच्या या काम करण्याच्या प्रेरणेतून आपण सुद्धा शिकल पाहिजे.गायकवाड मॅडमनी खरोखरच आपलं जीवन हे या मुलांसाठी ,समाजासाठी झोकून दिलं आहे.अशा या मायमाऊलीची प्रत्येकाने प्रेरणा घेत काम केलं पाहिजे. आपला, जो महिलादिनी सन्मान केला तो आपण कधीच विसरणार नसल्याचे सांगून, आपले या शाळेला नेहमीच सहकार्य असेल असे सांगितलं.
श्रीम्.गाडगीळ यांनी सुद्धा आपल्या जीवनात घडलेल्या घटनांचा उल्लेख करत,कधीही जीवनात संकटाना न घाबरता आपण मोठ्या जिद्दीने पुढे जाऊन आपली व समाजाची प्रगती साधली पाहिजे तसेच इतरांसाठी मदत करण्याचे आवाहन केले. दांडेली सरपंच निलेश आरोलकर यांनी सुद्धा आपण या शाळेसाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री.पाटील सरांनी उपस्थित महिला वर्गाला मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात या शाळेतील मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.यावेळी श्रीम् . गायकवाड यांची नात कु. शिवानी हिचा वाढदिवस साजरा करून येथील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय व माऊली मतिमंद शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महिलावर्ग, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोज चव्हाण तर आभार प्रदर्शन अस्मिता कुडाळकर मॅडम यांनी केले.


