सावंतवाडी : येथील नजीकच्या माजगाव गावातील युवकाचा दाभिल नदीपात्रात आज सायंकाळी ४:०० वाजताच्या सुमारास सरमळे येथे बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा युवक आंघोळ करण्यासाठी आला होता. बांदा पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली. हा युवक माजगाव येथे राहत असल्याने माजगाव व शेजारील आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी ही घडलेली घटना पाहण्यासाठी गर्दी केली होती. बरेच शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. बुडालेल्या युवकाचे नाव निखिल सूर्यवंशी असून हा माजगाव येथे आपल्या परिवारासोबत राहत होता. बांदा पोलिसांनी मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील कारवाईसाठी आणण्यात आला आहे.
माजगाव येथील युवकाचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


