आ. निलेश राणे यांचा ‘असा’ होणार वाढदिवस.! : संजू परब. ; सह्याद्री फाऊंडेशन व संजू परब मित्र मंडळातर्फे १५ ते १७ मार्च रोजी नाट्यमहोत्सव व समाजोपयोगी कार्यक्रमांचेही आयोजन.

सावंतवाडी : कुडाळ – मालवण मतदार संघाचे दमदार आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री फाऊंडेशन व संजू परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १७ मार्च असा तीन दिवसीय नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे यामध्ये ट्रीकसिनयुक्त दोन दशावतारी नाट्यप्रयोग तर एक ऐतिहासिक नाट्यप्रयोग होणार आहे. शहरातील भोसले उद्यान समोर हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संजू परब यांनी आज येथे दिली. संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, तालुका अध्यक्ष रवींद्र मडगावकर, प्रल्हाद तावडे, नंदू शिरोडकर, प्रताप परब, मोहिनी मडगावकर, विनोद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संजू परब म्हणाले, आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यात १५ मार्च ते १७ मार्च या तीन दिवसात हे विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये गरजू लोकांना धान्यवाटप, रुग्णांना फळ व औषध वाटप तसेच हॉस्पिटलमध्ये बेडशीट वाटप आदी विविध कार्यक्रम करण्यात येणार आहेत.
या शिवाय दररोज सायंकाळी सात वाजता शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले स्मृति उद्यान येथे नाट्यप्रयोग होणार आहेत.


यामध्ये १५ मार्च रोजी कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा ‘जय जय रवळनाथ ‘ हा ट्रीकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. तर १६ मार्चला जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ यांचा ट्रीकसिनयुक्त ‘कृष्णभक्त कुुम्मनदास ‘ हा नाट्य प्रयोग तसेच १७ मार्च रोजी गणेश ठाकूर दिग्दर्शित अफजलखानाच्या वधावर आधारित रोमहर्षक ऐतिहासिक नाट्य कलाकृती ‘नरसिंहशिवराय’ नाट्यप्रयोग होणार आहे.


तरी या विविध कार्यक्रमांचा व नाट्यपुष्पांचा नाट्य रसिकांनी व नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles