Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

जे आम्हाला संपवायला निघाले होते तेच आज हद्दपार झाले, ‘राणे’ म्हणतात आम्हाला.! : आ. निलेश राणे यांची तुफानी फटकेबाजी.

सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीत मी जिंकू नये म्हणून आमच्याच जवळच्या लोकांनी प्रयत्न केला. पण ते एवढं सोपं नाही. जे आम्हाला संपवायला निघाले तेच जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार झाले. ‘राणे’ म्हणतात आम्हाला.!’, अशा शब्दांत आमदार निलेश राणेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. वाढदिनी श्री देव पिंपळ मारूती
क्रिकेट चषक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

श्री. राणे पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री खास.नारायण राणे यांना कॉपी करण्याचा अनेक जण प्रयत्न करतील. पण, या जन्मात त्यांना कॉपी करता येणार नाही. प्रति नारायण राणे बनायला जमणार नाही. नारायण राणे सहज होता येत नाही. त्यासाठी मेहनत, कष्ट, धमक असावी लागते असं विधान केलं.

सावंतवाडीतील जिमखाना मैदान येथील उद्घाटनप्रसंगी त्यांनी दिपेश शिंदे यांचही कौतुक केले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना नेते मंदार नार्वेकर, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, कॉग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संदीप गावडे, महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, पत्रकार राजेश नाईक, सत्यवान बांदेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, सुमित वाडकर आदी उपस्थित होते.

ADVT –

 

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles