मंत्री गिरीश महाजनांच्या दिशेने बाटली भिरकावली, बदलापुरात आंदोलकांचा रुद्रावतार. ; ‘फाशी द्या.!’च्या घोषणा सुरुच.

बदलापूर : बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकांवर आंदोलकांनी रुद्रावरतार धारण केलाय. आंदोलकांकडून आरोपींना ‘फाशी द्या’च्या घोषणा सुरुच आहेत. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन  यांच्याकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आंदोलकांकडून त्यांच्यावर बाटली फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अजूनही बदलापूरमधील जमाव पांगवण्यात पोलिसांना अपयश आलंय.

पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला –

बदलापूर रेल्वे स्थानकात परिस्थिती जैसे थे आहे. आज सकाळपासून आंदोलकांनी रेल्वे स्थानकांवर जमण्यास सुरुवात केली होती. अद्याप आंदोलक मागे हटलेले नाहीत. पोलिसांसह सर्व यंत्रणा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र,मात्र आंदोलक हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय. आजूबाजूच्या शहरातील पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles