नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल 26 दिवसानंतर आमरण उपोषण सोडलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केलं होतं. रात्री उशिरा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या भेटीनंतर सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दोन्ही मंत्र्यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचूक यांची भेट घेतली. सोनम वांगचूक यांनी सहज हे उपोषण सोडलं नाही. त्यांच्या काही अटी केंद्र सरकारला मान्य करायला लावल्या. त्यानंतर त्यांनी हे उपोषण सोडलं आहे. 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मार्च काढला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला.
या प्रकरणात विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, असा शब्द सराकरने त्यांना दिला आहे.
पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी संसदेत सरकार चर्चा करेल, असं आश्वासन त्यांना दिलं आहे.
नीट (NEET) पेपरफुटीमुळे काही विद्यार्थ्यांनी जीवन संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला. त्यांना नुकसान भरपाई देण्याचा विचार होईल, असं आश्वासन सरकारने दिलं आहे.
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सरकारच्या या निर्णयांची माहिती दिल्यानंतर सोनम वांगचूक यांनी नड्डा यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.
राजधानी दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे गेल्या 25 दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून उपोषण सुरू होतं. अखेर 26व्या दिवशी वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतलाय. सोनम वांगचुक यांना सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपले उपोषण संपवले आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवल्याबद्दल कॉक्रोच जनता पक्षाचे सर्वेसर्वा अभिजीत दीपके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यात एकीकडे सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे सोडलं असताना दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम असल्याचे ते म्हणाले आहे.

अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, ‘सोनम सरांनी 26 दिवसांनंतर आपले उपोषण संपवल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत. मात्र धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत जंतर मंतर येथील ‘कॉकरोच जनता पार्टी’चे शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील.”



