Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून ३ महिन्यात डायलेसिस सेंटर उभारण्यास हालचाली सुरु.! ; ना. नितेश राणे तालुक्याचा विकास करण्यास सक्षम, तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास.! 

दोडामार्ग : निवडणुका आल्या की दोडामार्ग तालुक्याला गाजर स्वरूपात आश्वासन देणे हा प्रकार अनेक वर्षे निवडणुकीत चालूच आहे. सन  २०१७ – १८ मध्ये दोडामार्ग तालुक्यात ऐतिहासिक आरोग्याचा जन आक्रोश आंदोलन झाले, तरी पण आरोग्याच्या सुविधा असून नसल्या प्रमाणे आहेत.
आज ग्रामीण रुग्णालयात एका वर्षात फक्त १० गरोदर महिलांवर्गाची प्रसूती झाली, आणि १००हुन अधिक महिलांना गोवा राज्यात पाठवण्यात आले आहे. साधा आजार असेल तर ही उपचार घेण्यासाठी गोवा राज्यात पाठवले जाते.ही दयनीय परस्थिती आपल्या आरोग्य सेवेची आहे.
तालुक्यात हृदय विकाराचे रुग्ण वाढ झपाट्याने चालली आहे,अनेक तरुण युवाकांचे प्राथमिक उपचारा अभावी हृदय रोगाच्या आजारामुळे आपला जीव त्यांना गमवावा लागला आहे.
अनेक वर्षे प्रलबीत असलेला आरोग्याच्या ह्या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक आमदार माजी पालकमंत्री मा. ना.श्री. दीपक भाई केसरकर यांनी लक्ष देण्याची गरज होती मात्र ह्या महत्वाच्या प्रश्नाकडे का दुर्लक्ष केले जात आहे, आमच्या व्यथा ते का समजून घेत नाहीत? दोडामार्ग तालुक्यावर ह्या प्रश्नाकडे का दुर्लक्ष करतात ? तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न गेली अनेक वर्षापासून गंभीर असताना, दोडामार्ग तालुक्यातील सर्वसामान्य जनता आरोग्य सेवेसाठी तळमळत असताना मा. आमदार माजी पालकमंत्री मा.श्री दीपक केसरकर साहेब का लक्ष देत नाहीत.?
आरोग्य सेवे अभावी जे तरुण युवक प्राथमिक उपचार न मिळाल्या मुळे ह्रदय विकाराच्या आजारणे मृत्यू झाले याला जबादार कोण आहेत ?
आपल्या तालुक्यातील आरोग्य सुविधा जर सक्षम असती आणि तज्ञ डॉक्टर असते तर आज तालुक्यात प्राथमिक उपचारा अभावी तरुण दगावले गेले नसते,आज त्याच्या कुटूंबावर जी शोकांकळा पसरली त्याला जबादार कोण ?
गेली १५वर्षे आपण आमदार मा. श्री दीपक भाई केसरकर यांना निवडून देत आहोत, पण आपल्या सर्व सामान्य जनतेचा महत्वाचा असलेला आरोग्याचा प्रश्न सोडवण्यास मात्र ते अपयशी ठरले. आपण आपल्या आरोग्य सेवेचा हक्क कोणाकडे मागणार आपल्या आमदार साहेबांकडे च ना ? मग आच्याकडे दुर्लक्ष का.? तालुक्यातील सर्व सामान्य जनतेने न भूतो न भविष्य असे “आरोग्याचा जनआक्रोश ” आंदोलन दोन वेळा २०/२० दिवस करूनही गाभीर्याने का घेतले जात नाही? आज सर्व सामान्य जनतेला आरोग्य सेवे साठी सर्व सामान्य जनतेला वणवन करावी लागते,
आज दोडामार्ग तालुक्यातील आरोग्य सेवेची परस्थिती अशी झाली की खायाला आहे पण दात नाहीत.

सन्मानीय पालकमंत्री ना. नितेश राणे यांची ओरोस येथे जनता दरबार मध्ये भेट घेऊन आरोग्य विषयी समस्या आम्ही मांडल्या त्यांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ दोडामार्ग रुग्णालयात डायलेसिस सेंटर उभारण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्स्क आणि सदर कंपनी यांना पाठवून येत्या तीन महिन्यात डायलेसिस सेंटर सुरु करण्यासाठी आदेश दिले .तशा हालचाली सुद्धा सुरु झाल्या आहेत. साहेबांची असणारी प्रशासनावरील पकड याची अनुभूती आज आम्हाला आली.आरोग्याचा प्रश्न सोडवण्याचा त्यांनी आम्हाला दिलेल्या शब्द पूर्णतःवास नेण्याच्या दिशेने हालचाली होतील हे आम्हाला एक सुखद धक्का म्हणावा लागेल.कारण दोडामार्ग तालुक्याला सहज काही मिळत नाही, आणि आंदोलन उपोषण करूनही तालुकावासीयांना आरोग्य सुविधा काहीच मिळाल्या नाहीत.
डायलेसिस सेंटर मुळे अनेक डायलेसिस रुग्णाना मोठा दिलासा मिळणार आहे.
युवा नेतृत्व पालकमंत्री ना. श्री. नितेश राणे यांच्या धडाडीच्या कार्य पद्धतीवर तालुक्यातील जनतेचा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे सन्मानीय श्री. राणे साहेब तालुक्यातील उर्वरित आरोग्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवतील.याचा विश्वास दोडामार्ग तालुक्यातील जनतेत निर्माण झाला आहे, अशी भावना दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुपचे अध्यक्ष श्री. वैभव इनामदार यांनी व्यक्त केली आहे.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles