Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

सावधान.! – शेअर मार्केटिंगमध्ये तब्बल १ कोटी २३ लाखांची फसवणूक, डोंबिवलीत नवा घोटाळा उघड !

ठाणे: टोरेस घोटाळ्याचे पडसाद अजूनही शांत झाले नसताना डोंबिवलीत आणखी एका मोठ्या फसवणूक प्रकरणाची पोलिसांत नोंद झाली आहे. ‘शेअर मार्केट’मध्ये मोठा परतावा देतो म्हणत ‘ग्रोथअप इंडिया’ आणि ‘अर्थयुक्ती कन्सल्टिंग’च्या नावाखाली तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अनिकेत मुजुमदार, संदेश जोशी आणि संकेत जोशी असे या फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी अजूनही फरार आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर येथील सेवानिवृत्त बँक कर्मचारी मोहन सावंत यांनी डोंबिवली पोलिस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मुलीच्या वर्गमित्र अनिकेत मुजुमदार याने त्यांची ओळख संदेश जोशी या व्यक्तीशी करून दिली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा 10 टक्के परतावा मिळतो, असे सांगून दोघांनी मिळून ‘ग्रोथअप इंडिया’ आणि ‘अर्थयुक्ती कन्सल्टिंग’ या क्लासेसच्या माध्यमातून विश्वास संपादन केला. डोंबिवलीतील ग्रोथअप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग या क्लासेसच्या माध्यमातून आधी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे क्लासेस घेतले जायचे. त्यानंतर त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे विश्वास संपादन करण्यात यायचे. त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जायची.

मोहन सावंत यांनी यात 10 लाख रुपये गुंतवले. त्यावर त्यांना 1.30 लाख रुपये परत मिळाले, उर्वरित रक्कम आणि परतावा देण्यात आला नाही. त्यानंतर पैसे मागितल्यावर आरोपींनी त्यांना धमकावले. पोलिसांमध्ये ओळख असल्याचे सांगत तक्रार करू नये, असा इशारा त्यांनी दिला. यानंतर मोहन सावंत यांनी या कंपनीची चौकशी केली असता त्याने अशाचप्रकारे आठ ते नऊ गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली. यानंतर सावंत यांनी सर्वच गुंतवणूकदारांना आपल्यासोबत घेत डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

दोन आरोपी ताब्यात –

या तक्रारीत गुंतवणूकदारांमध्ये अजित तोडकर, अमित गुप्ता, दिलीप बांभनिया, निकिता गाला, प्रणव जोशी, सुशमा साळवी, संकेत तळेकर आणि तान्हाजी पिचड यांचा समावेश आहे. या सर्वांची एकत्रित 1.23 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणात शेकडो लोकांची फसवणूक करत करोडो रुपयाची फसवणूक झाल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी 8 ते 9 जणांच्या तक्रारीवरुन विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे.

पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला कडक कारवाई करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या मते या फसवणुकीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार असून नागरिकांनी अशाप्रकारे शेअर मार्केटिंग, डिजिटल अरेस्ट, जास्त पैसे देण्याच्या आमिषाला बळी पडू नये. तसेच अशाप्रकारे कोणी करत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून केले.

ADVT –

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles