Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

‘ग्लोबल’ लीडरना ग्लोबल संधी.! – ॲड. नकुल पार्सेकर.

कुणी काहीही म्हणो, “पण माझा जो आदरणीय सुरेशजी प्रभू यांचा जवळून अभ्यास आणि माझे आकलन आहे आणि जे निरीक्षण आहे त्यामुळे मी अगदी छातीठोकपणे सांगू शकतो की “येस, ही इज ए ग्लोबल लीडर.!”
काल साहेबांनी मला नेहमीप्रमाणे कोणत्याही भारतीयाला सार्थ अभिमान वाटावा अशी बातमी व्हाट्सऍप द्वारे पाठवली. मलाही खुप आनंद झाला. अर्थात बातमी होती जागतिक पातळीवरची. अमेरिकेच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांनी इतर देशासाठी टेरीफचा विषय ऐरणीवर आणल्यामुळे या बातमीला एक वेगळचं महत्त्व आहे.
*सुरेश प्रभू यांची “ब्लूमबर्ग” वर नियुक्ती. अशा त्यांच्या बाबतीत अनेक आनंददायी बातम्या सातत्याने ऐकायला मिळतो. आमचे कोकणचे सुपूञ आणि खऱ्या अर्थाने सरस्वतीपुञ आमच्या कोकणचा झेंडा अटकेपार फडकवत आहेत हे खरोखरच गौरवास्पद आहे.
अमेरिकेचे माजी वाणिज्य सचिव जीना रायमोंडा व इटलीचे माजी पंतप्रधान मारियो द्राघी ज्या ब्लूमबर्गच्या अॅडव्हायजरी बोर्डावर आहेत त्यामध्ये सुरेश प्रभू यांना संधी देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त या समितीत इंडोनेशियाचे माजी अध्यक्ष जोको विडोडो आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या उप व्यवस्थापकीय संचालक गिता गोपीनाथ व सिंगापूरचे हवामान कृती राजदूत रवी मेनन यांचा समावेश असून सुरेश प्रभू हे यामध्ये एकमेव भारतीय आहेत हे विशेष.
प्रभू साहेबांचा सुक्ष्म अभ्यास नाही असा एकही विषय नाही. बॅकिंग, हवामान बदल, शिक्षण, उर्जा, पर्यावरण, पायाभूत सुविधा, परराष्ट्र धोरण, ग्रामीण विकास, जल व्यवस्थापन, शाश्वत विकास अशा एक नाही अनेक विषयात जागतिक स्तरावर या वयातही सक्रिय असणाऱ्या आमच्या प्रभूसाहेबानां जगाच्या आर्थिक व्यासपीठावर आणखीन एक संधी मिळाली याबद्दल साहेबांचे मनापासून अभिनंदन!
साहेब..!, आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमचा.!

आगे बढो..! लगे राहो..!!

    – ॲड. नकुल पार्सेकर.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles