नागपूर : नागपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची एक बातमी समोर आली आहे. यात नागपूर येथून भंडाऱ्याच्या दिशेनं येणाऱ्या एका भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यावरील डिव्हायडरवर धडकली. या भीषण अपघातात वाहनानं तीन पलट्या खाल्ल्यात. या अपघातात पत्नीचा घटनास्थळीचं मृत्यू तर पती, मुलगी आणि मेहुणा असे तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूरच्या कुही – मांढळ फाट्यावर मध्यरात्री घडली.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथील कृष्णा शेंडे हे पत्नी नीलम (२७), मुलगी देवांशी (४) आणि मेहुना हेमंत साऊस्कार हे चौघे नागपूरवरून भंडाऱ्याकडं येत असताना ही घटना घडली. यात नीलमचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून तिघांवरनागपूर येथे उपचार सुरू आहे.
ADVT –


