सावंतवाडी : माडखोल गावचे माजी उपसरपंच ॲड. सुरेश आडेलकर व कुटुबियांकडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 1 मे रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याच त्यांच म्हणणं आहे. यामुळे लाखो रुपये कर्ज काढून बांधलेली इमारत वापराविना पडून लाखो रूपयाचे नुकसान होत आहे. कर्जाचे हप्ते भरणे कठीण झालेले आहे. प्रशासनाच्या या नियोजन शुन्य कारभारा कंटाळून आपण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद सिंधुदुर्ग, यांच्या कार्यालयासमोर ०१ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता मी परिवारासह आत्मदहन आंदोलन करणार आहे. यामुळे होणाच्या परीणामाम पूर्णतः सरपंच ग्रामपंचायत माडखोल, गामपंचायत अधिकारी व गटविकास अधिकारी सावंतवाडी, हे जबाबदार आहेत असा आरोप श्री. आडेलकर यांनी केला आहे.
तसेच तात्काळ कार्यवाही करून करआकारणी करून असेसमेंट देण्यात यावा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ चे उल्लंघन केलेबाबत ग्रामसेवकावर कार्यवाही करण्यात यावी. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधिल कलम ३९ (१) ने उल्लंघन केलेबाबत सरपंच, मपंचायत माडखोल यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी, इमारत बांधुन ५ महिने वापराविना ठेवल्याबददल झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


