. आता फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही, जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत माघार नाहीचं, असा उपोषणकर्त्यांचा एल्गार.
. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री स्थानिक आमदार व संबंधित अधिकाऱ्यांना रजिस्टर ए.डी ने निवेदन पोहोच.
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फिजीशीयन, न्युरोलॉजीस्ट, हृदयरोग तज्ञ ही पद रिक्त आहेत. यामुळे रूग्णांचे हाल होत असून गोवा बांबोळीवर अवलंबून राहावं लागतं आहे. अनेकांनी आपले जीवही उपचारांवीना गमवावे लागले आहेत. त्यामुळे ही पद व इतर रिक्त पद तातडीने भरण्यात यावीत या मागण्यांकरिता आपल्या कार्यालयात निवेदन दिले होते व त्यानंतर 24 मार्च आंदोलन कारलं होतं परंतु त्यावेळी तारखा देऊन सदर आमची दिशाभूल करून त्याची आज तगायत दखल घेतली गेली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील शौचालय, स्नानगृह यांची दुरावस्था झाली आहे. ड्रेनेजची टाकी भरल्यान व आपली पाईपलाईन खराब झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. रुग्णांना,त्यांच्या नातेवाईकांना, डॉक्टर सिस्टर व इतर कर्मचारी यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच शवविच्छेदन कक्ष देखील मोडकळीस आला आहे त्यामुळे मृतदेहाची अवहेलना होत आहे या सर्व महत्त्वाच्या घटकांवर जाणून बोलून दुर्लक्ष होत आहे हे आमच्या आता निदर्शनास आले आहे त्यामुळे 1 मे रोजी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने हॉस्पिटल समोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. आणि जोपर्यंत डॉक्टर हजर होत नाही तसेच इतर सोयी सुविधा तातडीने त्याची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील याची नोंद घ्यावी असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी स्पष्ट केले आहे.
ADVT –


