जयपूर : आवेश खान याने चिवट बॉलिंग करत शेवटच्या बॉलपर्यंत खेचलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला 2 धावांनी थरारक विजय मिळवून दिला आहे. लखनौने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानने या धावांचा शानदार पाठलाग केला. त्यामुळे सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. राजस्थानला विजयासाठी 6 बॉलमध्ये 9 रन्सची गरज होती. मात्र आवेश खान याने 9 धावांचा बचाव केला आणि राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 178 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. लखनौने यासह या मोसमातील पाचवा विजय मिळवला. तर राजस्थानचा हा एकूण सहावा तर सलग चौथा पराभव ठरला.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!


