वेंगुर्ला : होडावडे गावात होडावडा क्षेत्रपालेश्वर मंदिर मार्गे वजराठ जाणाऱ्या रस्त्याचे डाबरिकरण काम सुरू आहे. सदर रस्त्यांचे काम करतांना रस्त्याची साईडपट्टी साफ न करतां कचऱ्यात मध्ये डांबरीकरणाचे काम सुरु आहे. सदर रस्त्याचे काम होडावडे ग्रामपंचायत सदस्य अरविंद नाईक यांनी थांबवले होते. मात्र सदर रस्त्याचे काम अजूनही निष्कृष्ट दर्शन सुरू आहे. संबंधित बांधकाम विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून ते काम चांगल्या दर्जाचे कसे होईल याकडे लक्ष केंद्रित करावे. लाखों रुपये रस्ते बांधकाम व सार्वजनिक उद्यासाठी खर्च केले जातात मात्र आज ग्रामीण भागातील विकास कामांकडे दर्जात्मक स्वरूप दिसून येत नाही पूर्णपणे गावातील विकास काम निकृष्ट दर्जाची केले जाताना दिसत आहे.
ADVT –



