मुंबई : ”हात पुढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील”, असा सल्ला मंत्री योगेश कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना योगेश कदम यांनी ट्विट करत हा सल्ला दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये योगेश कदम यांनी म्हंटलं आहे की, राज ठाकरे यांना एक आपुलकीचा सल्ला ठाकरेंच्या शिवसेना प्रमुखांची निती ही वापरा आणि फेकून द्या अशी राहिलेली आहे. स्वत:चा स्वार्थ साधून झाला की त्यांना रक्ताची नातीसुद्धा नकोशी होतात. याचाच प्रत्यय खुद्द राज ठाकरेंना देखील आहे. त्यामुळे आपुलकीचा सल्ला देतो. जरा जपून, आपण हात पुढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील, असं मंत्री कदम यांनी या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


