Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

खळबळजनक – एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ गुंतवणुकीवरील व्याज बुडीत ! ; १२४० कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये भरलीच नाही.

मुंबई : एसटी महामंडळातील ८७ हजार कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली १२४० कोटी रुपयांची रक्कम एसटीने पीएफ ट्रस्टमध्ये भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे १०० कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्रॅच्युईटीच्या दोन स्वतंत्र ट्रस्ट असून ८७ हजार एसटी कर्मचारी व अधिकारी यांचा भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफचे अंदाजे १२४० कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्रॅच्युईटीची अंदाजे ११०५ कोटी रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे २३४५ कोटी रुपयांची रक्कम फेब्रुवारी २०२४ पासून एसटीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली पीएफची रक्कम पीएफ ट्रस्टकडे भरणा केली जाते. ट्रस्ट ही रक्कम गुंतवणूक करते. त्यावरील येणाऱ्या व्याजातून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ही रक्कम ८.२५ टक्के इतक्या दराने परत, करण्यात येते.

गेले अनेक महिने एसटीने ही रक्कम गुंतवणूक केली नसल्याचे त्यावरील व्याज व चक्रवाढ व्याज बुडाले असून त्याचा फटका साहजिकच कर्मचाऱ्यांना बसणार आहे. संपानंतर शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम सरकारकडून एसटीला देण्यात येईल, असे शपथपत्र न्यायालयात दिले आहे. पण पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही, अशी शंका बरगे यांनी व्यक्त केली.
…………………………………….

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles