सावंतवाडी : श्रीमती सुनिता वामन चव्हाण माजी मुख्याध्यापिका पूर्ण प्राथमिक शाळा नंबर ४ सावंतवाडी यांचे मंगळवार दिनांक १५ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्या ७७ वर्षाच्या होत्या .त्यांनी एक आदर्श प्राथमिक शिक्षिका म्हणून नावलौकिक मिळविला होता .त्यांनी सन १९७० मध्ये ओटवणे येथून आपल्या शिक्षकी पेशाला सुरुवात केली व त्यानंतर सावंतवाडी , आरोंदा कन्याशाळा,निरवडे,माणगाव, व पुन्हा ओटवणे व सावंतवाडी पूर्ण प्राथमिक शाळा नंबर ४ अशी ३५ वर्षे एक आदर्श शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती .मुलांना प्राथमिक शिक्षणाबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून त्या घेत असत .मनोरंजनातून, गाण्यातून हसत खेळत प्राथमिक शिक्षणाचे धडे मुलांच्या बालमनावर कसे बिंबवता येईल यावर त्यांचा विशेष भर असे .मुलांचा बहुआयांगी विकास व्हावा म्हणून स्कॉलरशिप , वक्तृत्व स्पर्धा,भाषणे, अशा विविध बाबींवर विशेष लक्ष त्या देत असत व त्यांची तयारी त्या करून घेत असत .त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंत्यत आवडीच्या शिक्षिका होत्या .अजूनही त्यांचे विद्यार्थी -विद्यार्थिनी आठवण काढत असतात व आवर्जून विचारपूस करतात .सेवानिवृत्तीनंतर आपले कुटुंब, मुले, नातवंडे अशा आपल्या संसारातच त्या रममान झाल्या होत्या . त्यांचा स्वभाव खूपच प्रेमळ असल्याने त्या कुटुंबाबरोबरच मित्रपरिवारांच्या लाडक्या आई होत्या . त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा मुलगा श्री राजन चव्हाण ( डेप्युटी इंजिनियर बांधकाम विभाग- पुणे) दिनेश चव्हाण सिनि . स्टेशन मास्टर -कोकण रेल्वे सावंतवाडी) व मुलगी कुमुदिनी चव्हाण (माध्यमिक शिक्षिका झरेबांबर दोडामार्ग ) दोन सुना सौ देवयानी उर्फ नंदा चव्हाण (माध्य शिक्षिका आरोस विद्या विकास ) व सौ . सानिया चव्हाण ( महसूल विभाग सावंतवाडी ) जावई श्री वासुदेव चव्हाण ( प्राथ शिक्षक दोडामार्ग ) व ५ नातवंडे कु . सिद्धी ( इलेक्ट्रॉनिक्स इजि . ) यशोधन ( सिव्हील इंजिनिअर ), डॉ .प्रथमेश ( एमबीबीएस )आदिती, चिन्मयी असा परिवार आहे . मंगळवार दि १५ एप्रिल रोजी त्यांच्या पार्थिवावर सावंतवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते . दिनांक २६ एप्रिल रोजी लक्ष्मीनगर सावंतवाडी येथील त्यांच्या नविन निवासस्थानी त्यांच्या १२ व्या दिवसाचे कार्य होणार आहे .
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


