– रूपेश पाटील.
कुडाळ :
पहिला कार्यकर्ता – ओ.. आता खयचा इलेक्शन आसा?
दुसरा कार्यकर्ता – जिल्हा परिषद, पंचायत समिती असताला, असा माका वाटता!
पहिला – बरा… याक सांगशात?
दुसरा – काय तां?
पहिला – आज तुमका किती दिले?
दुसरा – 200/
पहिला – काय सांगतास?
दुसरा – होय तर, आमका सगळ्यांका 200 चं गावले..!, काय झाला?
पहिला – माका फक्त 150 चं दिले मओ!
दुसरा – म्हणजे 50/ कमिशन खाल्ल्यानी दिसता?
पहिला – जावंदे… जे गावले ते घेतलय मी … पण जेनी माझ्या हिश्याचो 50/ खाल्ल्यानी त्तेचा काय ता देव उपरलकर बघून घेतलो..
दुसरा – ओ भाऊ… जरा हळू… नाय तर ते उप्रलकरांनी आयकला तर प्रॉब्लेम होतलो…
(जोरदार हशा पिकला )
वरील संवाद आहे तो गुरुवारी कुडाळ येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी सावंतवाडी तालुक्यातून आलेले ( की रोजंदारीने आणलेले?) दोन कार्यकर्त्यांमधील.
यावरून एकचं गोष्ट लक्षात येते की, आता कोणतीही राजकीय सभा असो की अजून काही कार्यक्रम. कार्यकर्ते हे पैसे देऊनचं आणावे लागतात. दुर्दैव म्हणजे जे लोकं पैसे घेऊन सभेला येतात ते ज्यांनी त्यांना आणलं त्यांचं किती प्रमाणात प्रामाणिकपणे कामं करतील?, यात नक्कीच शंका आहे.
असो..!
मात्र वरील संवादामुळे अजून एक गोष्ट लक्षात येते ती अशी की, काही कार्यकर्त्यांना 200/ रुपये तर काहीना 150/ रुपये देऊन कार्यकर्त्यांचं देखील वर्गीकरण करण्यात आले. यामुळे भाडेतत्त्वावर आणलेल्या कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला. आता पुढे जाऊन हीच कार्यकर्ते सभेसाठी आणलेल्या पक्षाचे किती चांगले काम करू शकतील हे काळचं ठरवेल. मात्र आता कोणत्याही सभेसाठी सर्रासपणे भाडेतत्त्वावर कार्यकर्ते नक्की मिळतात यावर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे.
ADVT –
https://satyarthmaharashtranews.com/12262/


