सावंतवाडी : आज गुरुवार, २४ एप्रिल २०२५ रोजी ‘ राष्ट्रीय पंचायत राज दिवस ‘ या दिनाचे औचित्य साधून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी कोलगाव येथील ग्रामपंचायतीला भेट दिली. त्यांच्यासोबत त्यांच्या वर्गशिक्षिका कु. अंकिता गवस व सहा. शिक्षिका कानिका राजपुरोहित व श्री. कपिल कांबळे सर उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी श्री. अरुण जाधव व तेथील कर्मचाऱ्यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे चांगल्या प्रकारे स्वागत केले. ग्रामपंचायतीमधील सदस्य आपले कार्य कशाप्रकारे करतात हे सविस्तर सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनातील शंका त्यांच्यासमोर मांडल्या. जसे की, ग्रामपंचायती मधील सरपंचाचे कार्य कोणते?, ग्रामपंचायत केव्हापासून सुरू झाली?, ग्रामपंचायत कधीपासून सुरू झाली? असे विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले. आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचा कार्यभार कशाप्रकारे चालतो व आज राष्ट्रीय पंचायत राज दिवस का साजरा केला जातो? याचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यानंतर, त्यांनी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे खाऊवाटप केले. विकेंद्रित आणि सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था प्राप्त करणे हे पंचायती राज व्यवस्थेचे मूलभूत उद्दिष्ट आहे. आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना आज प्रत्यक्षात ग्रामपंचायतीमध्ये प्रशालेतून न्हेण्यात आले. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या बुद्धीस चालना देणारा ठरला. या कार्यक्रमाचे संयोजन प्रशालेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी केले. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!