Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे २०२५ वर्षाचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर !

कुडाळ : उद्योग क्षेत्रात उत्पादनाची गुणवत्ता टिकली पाहिजे तर त्यासाठी कामगारांचे कौशल्य व गुणवत्ताही महत्त्वाची असते. काही उद्योगामध्ये उद्योगावर व मालकांवर निष्ठा ठेवून काम करणारे कामगार आजही कार्यरत आहे. अशा कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने गुणवंत कामगार पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने २०२५ या वर्षातील गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर व कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर आणि गुणवंत कामगार पुरस्कार निवड समितीचे समन्वयक हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी जाहीर केले असून काही दिवसातच एका विशेष कार्यक्रमात हे पुरस्कार संबंधित कामगारांना वितरित करण्यात येणार आहेत.

‘हे’ ठरले पुरस्कारांचे मानकरी –

महाराष्ट्र इंडस्ट्रीजचे दत्तराज केरकर, महाराष्ट्र फॅब्रिकेटचे लक्ष्मण करगुंटकर, सुमो कंटेनर्सचे सुनील धुरी, साई शक्ती आॅटोचे दीपक लिंगे, अमृता कॅश्यूचे सुनील परूळेकर, नेष्ट ड्राईव्ह आॅटो अमोल कुडपकर, मयुरेश अॅग्रोचे बाळा कुभांर व दळवी व सन्स या उद्योगाचे प्रकाश पिरनकर अशा आठ जणांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles