Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

युवा रक्तदाता व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या लढ्याला यश.! ; उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत तज्ज्ञ डॉक्टर झाले उपलब्ध व इतर पदे भरती.

सावंतवाडी : सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटना, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या आक्रमक पवित्र्यानंतर उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे फिजिशिअन पदावर ऑनकॉल पध्दतीने डॉ. अभिजित चितारी व डॉ. मुकुंद अंबापुरकर यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. १ मे महाराष्ट्र दिनी हे दोघेही कामावर रूजू झाले आहेत. तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी भरती प्रक्रियेत सावंतवाडीसाठी कायमस्वरुपी फिजीशीयन उपलब्ध होईल असे आश्वास्त केले आहे.तसेच वाढीव एक सुरक्षारक्षक व एक परिचारिका ही पदे तातडीने भरली आहेत.

शासनाच्या आवाहनानंतर सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेकडून १ मे रोजी होणारे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलं होतं. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फिजीशीयन, न्युरोलॉजीस्ट व हृदयरोग मिळावा अशी मागणी संघटनांची होती. यासाठी उपोषण देखील करण्यात आले होते. तसेच पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचेही लक्ष वेधण्यात आले होते.

दरम्यान, तात्पुरत्या स्वरुपामध्ये फिजिशिअन ऑनकॉल पध्दतीने डॉ. चितारी व डॉ. अंबापुरकर यांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून ते कामावर रूजू झाले आहेत. वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी त्यांचे उपजिल्हा रुग्णालयात स्वागत केले. यावेळी आंदोलनकर्ते युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव,‌ जीवनरक्षा प्रतिष्ठानचे राजू मसुरकर, प्रा. शैलैश नाईक, बालरोगतज्ञ डॉ देसाई, अॅड. प्रथमेश प्रभू, रूपा मुद्राळे, समीरा खलील, लक्ष्मण कदम, संदीप निवळे, दीपक मडगावकर, राजू धारपवार, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, ओंकार मसुरकर, वसंत सावंत, अॅड. प्रसाद नाटेकर आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles