संजय पिळणकर.
सातार्डा : साहित्याची आवड असलेले लोकप्रतिनिधी चांगले असतात.समाजाचा विकास करतात. साहित्यिक जयवंत दळवीनी जिवंत पुस्तके लिहिली.समृद्ध लेखन केले असे प्रतिपादन प्रगतशील शेतकरी व साहित्यिक जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी यांनी ‘ एक सायंकाळ साहित्यिकांच्या सहवासात ‘ कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे उदघाटन साहित्यिका उज्वला धानजी यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी सरपंच संदीप प्रभू, कवठणी सरपंच अजित कवठणकर, भाजपचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर, समन्वयक विनय सौदागर, ग्रामपंचायत सदस्या शर्मिला मांजरेकर, माजी सरपंच उदय पारिपत्ये, गजानन शिरसाट, शेखर केरकर,माजी जि.प.अध्यक्षा मधुमती बागकर, माजी पं.स.सदस्या श्रुतिका बागकर, सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर, मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, चंद्रशेखर धानजी, कार्यक्रम पुरस्कर्ते सावळाराम शिरोडकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
साहित्यिक, राजकीय प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते असा दुर्मिळ योग साहित्य प्रेरणा कट्टाच्या ५४ व्या मासिक कार्यक्रमामध्ये पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाने घडवून आणला. साहित्यिक जयवंत दळवी विलक्षण माणूस होते. जीवनातील घडामोडिंवर त्यांनी पुस्तके लिहिली. प्रायोगिक नाट्यप्रयोगांमुळे साहित्यिक दळवी लोकांपर्यंत पोहचले असे मनोगत साहित्य प्रेरणा कट्टाचे समन्वयक विनय सौदागर यांनी व्यक्त केले.
साहित्यिका उज्वला धानजी म्हणाल्या,सातार्डा टिळक ग्रंथालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष व साहित्यिक जयवंत दळवी यांची शताब्दी हा दुग्ध शर्करा योग आहे. टिळक ग्रंथलयाने शालेय मुलांना घेऊन केलेले उपक्रम हे देव कार्य आहे.प्राध्यापक सदाशिव धूपकर, वाचक सोमा गावडे,सरोज रेडकर यांनी विचार व्यक्त केले.
उज्वला धानजी,चंद्रशेखर धानजी,जयदीप देशपांडे,सोमा गावडे,दिलीप पांढरे,पत्रकार अनिल निखार्गे,एकनाथ शेटकर,अविनाश जोशी,सिंधू दीक्षित,अनिता सौदागर, अपूर्वा सौदागर,अरुण धरणे यांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
साहित्यिक जयवंत दळवी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.स्नेहल मांजरेकर यांनी स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
ग्रंथालय मंडळाचे कार्यकर्ते ज्ञानदीप राऊळ, नारायण बागकर, प्रभाकर मांजरेकर, सदू सातार्डेकर, शिक्षक जी. डी. कुंदे, प्रसाद मांजरेकर, उत्कर्षा आरोदेकर, पांडुरंग हळदणकर, संदेश कवठणकर, दीपक मांजरेकर, आनंद तानावडे, प्रितेश आरोदेकर, ग्रंथपाल संजय कवठणकर, विलास मांजरेकर, स्नेहल बागकर, निवृत्त शिक्षक दत्ता भगत, उमेश मांजरेकर, शरद राऊळ, सचला पाटील, विनया शिरसाट, समिधा मांजरेकर, संज्योती पेडणेकर, शेफाली राऊळ, चव्हाण सर, श्रीधर बागकर,महापुरुष मंडळाचे कार्यकर्ते,ग्रामस्थ व वाचक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी केले.तर आभार कार्यवाह धनंजय केरकर यांनी मानले.
ADVT –
https://satyarthmaharashtranews.com/12262/


