Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

घरात घुसून मारलं!, पाकिस्तानमधील 9 ठिकाणं उद्धवस्त ; भारतानं मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का दिले?

नवी दिल्ली : ज्या क्षणांची प्रतीक्षा तमाम भारतीय करत होते अखेर तो क्षण आलाच. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सेनेनं बदला घेतला आहे.  पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय वायुदलानं (Indian Air Force) आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं होतं. मात्र हे केवळ एका मोहिमेचे नाव नसून या नावामागे अनेक अर्थ दडल्याचे सांगितले जातंय. नाव देण्यामागे नेमकं कारण काय? हे आता आपण जाणून घेऊ.

भारतानं मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव का दिले? 

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती. या दहशवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता.  मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं. सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी झाडली आहे.

या कृत्यानं नक्कीच एक गोष्ट अधोरेखित केली जात आहे ती म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवर ही हल्ला असल्याचे बोलले जात आहे. या भ्याड हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष करण्यात आलं. दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना जिवानिशी मारण्याचाच नव्हता, तर भारतीय संस्कृती, देशातील एकता  आणि  देशाच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा होता. त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या हेतूने या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आल्याचे बोलले जात आहे.   या सांस्कृतिक आणि भावनिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने ही मोहीम सुरू केली आणि त्यात यश ही मिळवले आहे.

भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?

1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर

2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर

3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर

4. गुलपूर

दशतवाद्यांचा अड्डा 
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी 

5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर

6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.

7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा 
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर 

8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा 
सीमेपासून 8 कि.मी.दूर

9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles