सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आडगाव येथील मानसी पांढरे हिची पुणे कारागृह पोलीस पदी स्तुत्य निवड झाली आहे.
मानसीचे दहावीपर्यंतचे शिक्षण आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलमध्ये झाले आहे.
तीने पोलीस होण्यासाठी अतोनात मेहनत घेतली.
महेंद्रा अकॅडेमी येथे तीने अभ्यास आणि मैदानी परीक्षेचा सराव केला. तिला महेंद्र पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
मानसीच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


