सावंतवाडी: ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग आणि सार्थक फाऊंडेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि. ११ मे २०२५ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत काझी शहाबुद्दीन हॉल, एस टी स्टॅंडसमोर, सावंतवाडी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. आपल्या जिल्ह्यातील पेशंटसाठी रक्ताची गरज असताना कायम उपयुक्त ठरणारी GMC रक्तपेढी रक्तसंकलन करणार आहे. या रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त म्हणजे शंभर ते सव्वाशेपेक्षा जास्त रक्तदात्यांनी या ठिकाणी येऊन रक्तदान करावे, असे आवाहन ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग आणि सार्थक फाऊंडेशन, गोवा यांनी केले आहे.
विशेष म्हणजे यावेळी वयस्कर लोकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीरही आयोजित केले आहे, सदर शिबिराचा सुद्धा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे विनंतीपर आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
सावंतवाडी येथे रविवारी भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर! ; ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग व सार्थक फाऊंडेशन, गोवा यांचे संयुक्त आयोजन
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


