Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

पत्नीची हत्या करून पंलगात मृतदेह लपवला ! ; १५ वर्षाच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट.  

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 15 वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. मात्र या प्रेमाचा भयानक शेवट झाला आहे. आरोपीनं महिलेची हत्या करून तिचा मृतदेह घरातील पलंगात कोंबला होता. यानंतर आरोपी पळून गेला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, रागिणी सावर्डेकर असं हत्या झालेल्या ६३ वर्षीय महिलेचं नाव आहे. पती प्रताप बस्कोटी सोबत ती मुंबईच्या गोरेगाव परिसरात वास्तव्याला होती. आरोपी पतीने रागिणीची निर्घृण हत्या केली. यानंतर त्याने रागिणी यांचा मृतदेह पलंगात लपवला आणि शेजाऱ्याकडे चावी देऊन पळ काढला. घर सोडताना आरोपीनं आपण पत्नीसह बाहेर जात असल्याचे खोटं सांगितलं. दरम्यान आरोपीच्या घरातून उग्र वास येऊ लागला, यामुळे शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला असता पलंगात कोंबलेल्या अवस्थेत रागिणी यांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती त्यांनी गोरेगाव पोलिसांना दिली असता तात्काळ ते घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपी प्रताप बस्कोटी याच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान ज्या घरात रागिणीची हत्या झाली, ती चाळीतील खोली रागिनी यांच्या नावावर होती. हीच खोली बळकवण्यासाठी प्रतापने रागिणीची हत्या केली असावी, असा स्थानिकांचा सशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रतापचा शोध घेतला जात आहे.
…………………………………….

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles