सावंतवाडी : कोकणाचा श्वास असणारी लोककला म्हणजे दशावतार ! अनेक दशावतार कंपनी कोकणात आहेत .आपल्या दशावतारकलेच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन व आपल्या देवी-देवतांचे महत्त्व सांगितले जाते. दशावतार नाटकाच्या माध्यमातून आध्यात्मिक पौराणिक कथांच्या माध्यमातून लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचविल्या जातात. दशावतार क्षेत्रातील अशीच एक कंपनी म्हणजे श्री देव सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ले. याचे संचालक श्री. काका आकेरकर. या नाट्य मंडळाचा सध्या बहुचर्चित असलेला नाट्यप्रयोग म्हणजे ‘श्री क्षेत्र गाणगापूर’. दत्तभक्तीवर आधारित व प्रबोधनात्मक नाट्य प्रयोग या नाट्यप्रयोगाचे कथा संकल्पना गुरुवर्य श्री.अजित गाडगीळ यांनी केले असून गुरुजींच्या मार्गदर्शनाप्रमाणे याच नाट्यमंडळात कार्यरत असणारा कु. साईल तळकटकर याने अधिक वाचन करून माहिती गोळा करून हा नाट्य प्रयोग कलाकारांना समजावून सांगून सादरीकरण करण्यास सुरुवात केली.
या नाट्यप्रयोगात अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत रसिका मायबापांना प्रबोधन केलं जातं. या नाट्यप्रयोगातील पहिला प्रवेश हा नाटकात रंगतदार ठरतो. या पहिल्या प्रवेशात या नाट्यमंडळात खलनायकाची भूमिका करणारे राहुल धुरी आणि गंधर्वाची भूमिका करणारा कु. साईल तळकटकर योग्य प्रकारे पौराणिक अभ्यास लोकांना सध्या आवडणारा संयुक्त दशावतार प्रमाणे संघर्ष पौराणिक प्रश्न उत्तर देऊन व गाणगापूर कसं निर्माण झालं?, हे रसिक मायबापांना पटवून देतात. नाटकातील पहिल्या प्रवेशाने लोकांच्या मनात नाटकात पुढे काय होईल? ही उत्सुकता निर्माण होते.
दत्त महाराजांचा दुसरा अवतार म्हणजे श्री. नृसिंहसरस्वती. यांच्या जीवनावर आधारित आध्यात्मिक असा हा नाट्यप्रयोगात लोकांच्या मनापासून आवडत आहे. प्रबोधना बरोबर योग्य असे मनोरंजन देखील केले जाते. या नाट्यप्रयोगात शेवटच्या प्रवेशात कु. साईल तळकटकर यांच्या माध्यमातून गाणगापुराचे महत्व आणि लोकांना जे प्रबोधकेले जाते त्याच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर अनेक रसिक मायबाप कौतुकाची थाप मारतात. स्त्रीने केस मोकळे का सोडू नये?, हे लोकांना सांगत असताना नाट्यप्रयोग पाहण्यासाठी बसलेली माणसं हे ऐकताना आपले केस मोकळे असले तर बांधतात. गाणगापूर तीर्थक्षेत्र कसं निर्माण झालं? त्या तीर्थक्षेत्रात काय आहे? गुरुचरित्राचे महत्व, गुरुदत्तांच्या नामाचे महत्त्व हे या नाट्यप्रयोगातून रसिक प्रेक्षकांना सांगितले जाते. उत्कृष्ट असं वकृत्व असणाऱ्या साईल योग्य ते अभ्यास पूर्व मार्गदर्शन व पौराणिक प्रबोधन करतो. त्याचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होतो. व नंतर रंगमंचावरील श्री नृसिंहसरस्वती .
व श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी होणारी गर्दी, लागणाऱ्या रांगा या हा नाट्यप्रयोग लोकांना किती आवडला?, याची पोचपावती देऊन जातो.
साईल तळकटकर हा युवक रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीस उतरणारा दशावतारी कलाकार बनत आहे. श्री देव सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ नाट्य प्रयोग उत्कृष्ट प्रमाणे सर्व कलाकार नाट्य प्रयोग सादरीकरण करतात. गोड आवज व स्वरबद्ध गायन करणारे काका आकेरकर नाटकात संगीतमय वातावरण निर्माण करतात. या संचात श्री. महेश गावंडे, श्री. काका आकेरकर, श्री. चंदू मिशाळे, कु. श्रीपाद आरोलकर, श्री. राजन नाईक, श्री सुशील रेडकर, श्री. प्रमोद अकेरकर, कु.साईल तळकटकर, श्री. राहुल धुरी, श्री. ज्ञानेश्वर घाडी या मंडळात उतताम भूमिका साकारतात. उत्कृष्ट संगीतसाध हार्मोनियम श्री.अमोल आकेरकर, तालरक्षक कु. हर्षल शिरोडकर, पखवाज वादक श्री.राजू शिरोडकर या नाटकात सर्व कलाकारांचे अप्रतिम सादरीकरण नाट्य प्रयोगाच्या यशामागे कलाकारांचे असणारी मेहनत ही दिसून येते. तसेच दशावतार कलेचा वारसा जपला जावा व आपल्या देव संत यांच्या विषयी आजच्या युवा पिढीला माहिती मिळावी, यासाठी या नाट्यप्रयोगातुन कु. साईल तळकटकर यांनी अध्यात्माची सांगड घालून जबरदस्त प्रबोधन केले आहे. हल्लीच्या युगात लोक आवड असलेला श्री क्षेञ गाणगापुर हा नाट्यप्रयोग आहे या नाट्यप्रयोगास रसिकमायबापाच भरभरून प्रेम मिळवत लोकप्रिय ठरत आहे.


