Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

AI ‘या’ लोकांच्या नोकऱ्या नक्की खाणार? ; Fiverr च्या CEO चा मोठा इशारा !

तेल अवीव (इस्त्रायल) : AI म्हणजे आता फक्त सिनेमातली किंवा भविष्यातली गोष्ट राहिलेली नाही. ती आपल्या रोजच्या आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी वेगाने बदल घडवून आणत आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांनी AI च्या क्षमतेबद्दल आणि त्याच्या संभाव्य परिणामांबद्दल भाष्य केलं होतंच, पण आता फ्रीलान्सिंग क्षेत्रातील मोठी कंपनी Fiverr चे CEO मायका कॉफमॅन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक सडेतोड आणि स्पष्ट संदेश दिला आहे, जो ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले Fiverr चे CEO?

एका अंतर्गत ईमेलमध्ये, जो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला, मायका कॉफमॅन यांनी आपल्या टीमला एक प्रकारे इशाराच दिला आहे. ते म्हणाले, “AI तुमच्या नोकरीच्या मागे आहे… आणि माझ्याही!” हा संदेश खूप काही सांगून जातो. त्यांनी स्पष्ट केलं की AI मुळे अनेक क्षेत्रांतील नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात किंवा त्यांचं स्वरूप पूर्णपणे बदलू शकतं.

कॉफमॅन यांच्या मते, अनेक व्यावसायिक क्षेत्रं लवकरच ऑटोमेशनच्या कचाट्यात सापडू शकतात. यात प्रामुख्याने Programmers आणि Software Developers, विविध प्रकारचे Designers, Product Managers आणि Data Scientists यांचा समावेश आहे. इतकंच नाही, तर वकील आणि कायदेशीर सल्लागार, Customer Support Teams, सेल्स आणि मार्केटिंगमधील लोक, तसेच Finance आणि अकाउंटिंग क्षेत्रातील अनेक नियमित कामं आता AI च्या मदतीने होण्याची शक्यता आहे. त्यांनी हेही नमूद केलं की, हा धोका फक्त Fiverr पुरता मर्यादित नाही, तर प्रत्येक कंपनी आणि प्रत्येक Industry ला याचा सामना करावा लागणार आहे. अनेक कामं जी पूर्वी सोपी आणि नियमित मानली जायची, ती आता AI च्या मदतीने आपोआप होत आहेत.

यासाठी स्वत: मध्ये बदल कराल?

कॉफमॅन यांनी कर्मचाऱ्यांना घाबरून न जाता या नवीन टेक्नॉलॉजीला स्वीकारण्याचं आणि नवीन कौशल्ये शिकण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी काही AI Tools चा उल्लेखही केला, जे आजच्या काळात आत्मसात करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, डेव्हलपर्ससाठी Cursor, कस्टमर सर्व्हिससाठी Intercom Fin आणि कायदेशीर व्यावसायिकांसाठी Lexis+ AI. त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या टीममधील AI Experts ओळखण्यास, उत्पादकतेची व्याख्या नव्याने समजून घेण्यास आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs) सोबत काम करण्यात निपुणता मिळवण्यास सांगितलं. इतकंच नाही, तर ते म्हणाले की जर तुम्ही ‘Prompt Engineering’ मध्ये माहीर नसाल, तर तुमच्यासाठी गुगल सारखे पारंपरिक सर्च इंजिनही कमी उपयोगी ठरतील!

कंपन्यांसाठी काय संदेश?

कॉफमॅन यांचं म्हणणं आहे की, कंपन्यांनी नवीन लोकांना कामावर घेण्यापूर्वी हा विचार करायला हवा की AI च्या मदतीने सध्याच्या टीमची Efficiency कशी वाढवता येईल. त्यांच्या मते, आजच्या काळात AI चा वापर करणं हा काही पर्याय नाही, तर ती एक गरज बनली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles