सावंतवाडी : राजमाता जिजाऊ चौक मित्र मंडळ जिमखाना चौकच्या वतीने आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली, यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष अजीत सांगेलकर,संदिप इंगळे,मयुर लाखे,प्रणीत सावंत गुरूप्रसाद पेडणेकर, श्री सांगेलकल व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन म़डळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, उपस्थित सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीमा पूजन करुन महाराजांना अभिवादन केले.व लाडूचे वाटप करण्यात आले.
सीताराम गावडे यांनी मीत्रमंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करून ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली पण धर्म बदलला नाही अशा थोर लढवय्या छत्रपती संभाजी महाराजांचा ईतिहास आजही जिवंत आहे तो अशा प्रकारच्या मावळ्यांमुळेच असे गौरवोद्गार काढले व मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
राजमाता जिजाऊ चौक मित्र मंडळ जिमखाना चौकच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा ! ; सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


