कराची : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या एका मोठ्या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी देखील बॉम्बस्फोट झाला आहे. यामध्ये सल्लागार आणि मंत्री मुबारक जेब खान यांच्या घराचा दरवाजा उद्ध्वस्त झाला आहे. घराच्या गेटजवळ अज्ञातांनी हा स्फोट केला असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफचा सल्लागार आणि मंत्री मुबारक जेब खानच्या घरी आज मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. बॉम्बस्फोटात मंत्री मुबारक जेब खानच्या घराचा दरवाजा आणि काही भाग उद्ध्वस्त झाला आहे. मुबारकच घर पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या प्रांतात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोट झाला तेव्हा शाहबाजचा सल्लागार घरी नव्हता त्यामुळे तो बचावला आहे. मुबारक जेबच्या घराच्या गेटजवळ अज्ञात लोकांनी स्फोटक ठेवली होती. अशा हल्ल्यांना घाबरत नसल्याच शाहबाजचा सल्लागार मुबारकने म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


