मालवण : इयत्ता १० वीच्या परीक्षेत, २०२४ / २०२५ या शैक्षणिक वर्षासाठी मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलने १००% यशाची परंपरा कायम राखली आहे. रोझरी इंग्लिश स्कूलच्या १००% निकालाचे हे सलग २१ वे वर्ष आहे. यंदा रोझरी इंग्लिश स्कूलचे सर्व ५० विद्यार्थी विद्यार्थीनी १० च्या परीक्षा निकालात यशस्वी झाले असून त्यातल्या ३३ जणांना ‘डिस्टींक्शन’ मिळाले आहे. १२ जण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर ५ जण द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत.
रोझरी इंग्लिश स्कूलच्या कु. चैत्राली मेस्त्री हिने ९५.०८% गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांकाच्या कु. वेदांती फोंडेकर हिला ९३.०८% तर तृतीय क्रमांकासाठी कु. एरीक मेंडिस व कु. तृष्टी केळुस्कर यांना प्रत्येकी ९२.०८% गुण प्राप्त झाले आहेत. चतुर्थ क्रमांकाच्या कु. एल्विरा राॅड्रिग्ज हिला ९०.०२ गुण प्राप्त झाले आहेत.
रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्सल्वीस आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व सर्व यशस्वी विद्यार्थी – विद्यार्थीनींचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.


