सावंतवाडी : कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली गावामध्ये कोकणची पारंपरिक लोककला दशावतार मिनी नाट्य महोत्सव होणार आहे. स्वप्नपूर्ती मठकर फाऊंडेशन सोनुर्ली- पाक्याचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १६ व १७ मे रोजी रात्री ९ वाजता सोनुर्ली हायस्कुलनजीक हा महोत्सव होईल. १६ मे रोजी रात्री ९ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाटयमंडळ चेंदवण यांचा महान पौराणिक दणदणीत नाट्यप्रयोग ‘परकाया प्रवेश अर्थात राजा त्रि विक्रम’ होणार आहे. १७मे रोजी रात्री ९ वाजता सुनील गोसावी
प्रस्तुत अमृतनाथ दशावतार नाटयमंडळ म्हापण वेंगुर्ला यांचा आध्यात्मिक विषयावर एक आगळावेगळा नाट्यप्रयोग ‘लेक माझी तुळजाभवानी’ हा होणार आहे. तरी दोन्ही दिवस रसिकमायबापांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोनुर्ली पाक्याचीवाडीतील ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.


