Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

बातमी लई कामाची – ATM मध्ये दोनदा Cancel बटन दाबल्याने PIN चोरी होतो का ?

सावंतवाडी : जागृत ग्राहक मित्रांनो, तुम्हाला ATM च्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळायची असेल तर कार्ड टाकण्यापूर्वी ATM मशिनवर दिलेल्या पर्यायांमध्ये कॅन्सल बटण दोनदा दाबा! सोशल मीडियावर ही बातमी चांगलीच पसरत आहे. असे केल्याने ATM फ्रॉड टाळता येऊ शकते, असा दावा अनेकांनी केला आहे. आता या प्रकरणी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) फॅक्ट चेक रिपोर्ट जारी केला आहे.

ATM कार्ड सिक्युरिटीचे सत्य काय?

ATM मशिनमध्ये दोनवेळा कॅन्सल बटण दाबल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) नुकतीच या व्हायरल पोस्टचे खंडन केले आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, आरबीआयने ATM व्यवहारापूर्वी कॅन्सल बटण दोनदा दाबण्याचे निर्देश दिले होते जेणेकरून ATM पिन चोरीला जाऊ नये.

PIB फॅक्ट चेकने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे. RBI कडून असे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत, असे PIB कडून सांगण्यात आले आहे. अशा कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीवरच अवलंबून रहा. सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत, अशा सूचना आरबीआयकडून वेळोवेळी ग्राहकांना दिल्या जातात.

ATM कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी महत्वाच्या टिप्स –

  • ATM चा पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका, मग तो तुमच्या कितीही जवळचा असो.
  • ATM पिन टाकताना कीपॅड नेहमी झाकून ठेवा जेणेकरून तो कोणालाही दिसणार नाही.
  • शक्यतो निर्जन किंवा संशयास्पद ठिकाणी असलेल्या ATM मधून व्यवहार करणे टाळावे.
  • ATM कार्डने व्यवहार करताना स्टॉल आणि कीपॅड तपासा. कारण फसवणूक करणारे स्किमिंग डिव्हाइसचा वापर करून फसवणूक करतात.
  • आपल्या बँक खात्याशी संबंधित SMS किंवा अलर्ट तपासत रहा जेणेकरून आपल्याला सर्व प्रकारच्या व्यवहारांची माहिती वेळेवर मिळू शकेल. कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत व्यवहाराची स्थिती कळताच तात्काळ कारवाई करून बँकेला कळवावे.
  • आरबीआय किंवा बँकेच्या नावाने कोणत्याही कॉल किंवा मेसेजमध्ये आपला ATM पिन किंवा इतर कोणतीही गोपनीय माहिती देणे टाळा.
  • ATM चा पासवर्ड नियमित बदलावा.
  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेक न्यूज टाळा. नेहमी अधिकृत स्त्रोतांवर अवलंबून रहा.
  • ATM मध्ये कार्ड क्लोनिंग टाळण्यासाठी ईएमव्ही चिप-आधारित कार्डवापरा. संशयास्पद हालचाली झाल्यास तत्काळ बँकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
  • ऑनलाइन व्यवहारांसाठी नेहमी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles