सावंतवाडी : तालुक्यातील इन्सुली रमाईनगर येथील समाजमंदिरात भीम गर्जना युवक मंडळ, रमाईनगर यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती स्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन तसेच संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलाने झाली.
यावेळी जयंतीच्या शुभेच्छा देताना मंडळाचे अध्यक्ष धम्मचारी लोकदर्शी यांनी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला.संभाजी महाराजांना अवगत असलेल्या 14 भाषांचा उल्लेख करून त्यांनी लिहिलेल्या संस्कृत,पाली भाषांतील ग्रंथांचे महत्व विषद केले व महाराजांच्या विद्वतेची महानता स्पष्ट केली.
उपस्थितांमध्ये जेष्ठ सल्लागार राघोबा जाधव,युवा सदस्य सिध्देश जधव,सपना जाधव यांनी जयंतीच्या शुभेच्छा देताना संभाजी महाराजांनी प्रजेसाठी केलेल्या कार्याची महती सांगितली.शेवटी रमाईनगरातील दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सविता जाधव यांनी तर आभार संजना जाधव यांनी मानले.या कार्यक्रमात सदानंद जाधव,आनंद जाधव,अम्रित जाधव,तेजस जाधव,स्मिता जाधव,सानिका जाधव,सृष्टी जाधव,ललिता जाधव,स्मृतिषा जाधव,शर्मिला राम,दीपिका नेमाडे, मयुरी जाधव,दिक्षा जाधव,प्रद्युम जाधव ईत्यादींची विशेष उपस्थिती होती.