सिंधुदुर्ग : मानवजातीच्या परमकल्याणासाठी आणि रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव व सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोव्याच्या फोंडा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ दिनांक १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या भव्य महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण १७०० हून अधिक साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ मोठ्या उत्साहात गोव्याकडे रवाना झाले आहेत.
बांदा येथे तोरसे गावाचे उपसरपंच विजय तोरसकर यांनी श्रीफळ वाढवले. यावेळी
माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. श्वेता कोरगावकर यांनी वाहनाचे पूजन करून पुष्पहार घातला यावेळी वाफोली माजी सरपंच विष्णू गवस, धर्मप्रेमी स्वागत नाटेकर आदी उपस्थित होते
यासाठी बस – १७, टेम्पो ट्रॅव्हलर – १२, आणि इतर वाहने – १२५, अशा एकूण वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
सर्व सहभागी भगव्या टोप्यांमध्ये सजले होते, तसेच वाहनांवरील भगवे ध्वज आणि जयघोषाने संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि भगवेमय झाले होते.
या अभूतपूर्व सोहळ्याचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल अनेक धर्मप्रेमी व हिंदुत्वनिष्ठांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.


