सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे आंब्याच्या व जांभळाच्या झाडाखालील रस्ते आंबे व जांभळे पडून पूर्णपणे बुळबुळीत झाल्याकारणाने त्यावर वाहने स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहेत मागील दोन दिवसापूर्वी अवकाळी पावसात अशाच रस्त्यावर वाहने स्लीप होऊन चार अपघात घडले त्यामध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाले होते.
तरी पुढे आता मोठा पाऊस सुरू होणार आहे तर प्रत्येक नागरिकांनी आपल्या जीवाची योग्य अशी काळजी घेऊन आपली वाहने सावकाश चालवावीत कारण घरी आपल कुटुंब आपली वाट पाहत आहे.
सावंतवाडी शहरांतर्गत पावसामध्ये रस्त्यावर झाडे पडली असतील, पावसामध्ये कोणी कुठेतरी अडकून पडला असेल तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही मदतीची आवश्यकता असल्यास सावंतवाडी नगरपरिषद, पोलीस स्टेशन किंवा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी 9405264027/ 9423304674 या नंबर वर संपर्क साधावा या माध्यमातून तात्काळ मदत केली जाईल तरी मोठ्या वादळी पावसामध्ये शक्यतो बाहेर पडू नये असे आवाहन रवी जाधव यांनी नागरिकांना केले आहे.
अवकाळी पाऊसात कृपया वाहने सावकाश हाका ! ; नागरिकांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे आवाहन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


