सावंतवाडी : श्री श्रीपाद मठ सावंतवाडीत आज श्री शनि जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त ‘श्री रुद्र याग – स्वाहाकार” व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी दर्शन व तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री श्रीपाद शास्त्री गुरुजी व श्री नागेश शास्त्री गुरुजी, श्री श्रीपाद मठ सावंतवाडी व नरसिंह वाडी यांच्याकडून रुद्र याग (स्वाहाकार ) श्रीपाद मठ सावंतवाडी येथे होणार आहे. श्री नरसिंह वाडी येथील वैदिकी ब्राह्मणांद्वारे हा रुद्र याग होणार आहे श्री दत्त महाराज कृपा करून आहेत. तरी भाविक भक्तांनी दर्शन व प्रसादासाठी यावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
यानिमित्त आयोजित कार्यक्रम –
सोमवार – 26/05/2025
5.30 सायं 4.30 ते स्वामीकृपा प्रासादिक भजन मंडळ, हुमरस बुवा – श्री शैलेश नाईक, श्री गणेश नाईक पखवाज – श्री भूषण परब.
तबला – श्री प्रथमेश हुमरसकर
सायं 6 वा. भजन सेवा – गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ, वडखोल, वेंगुर्ला | बुवा – श्री. रुपेंद्र परब
रात्रौ 8 वा. दशावतारी नाटक – गोकुळचा चोर जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस
स्थळ: श्रीपाद मठ, झिरंगवाडी, सावंतवाडी


