चंडीगड : पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी पहलगाम येथे २६ पर्यटकांना ठार केल्यानंतर दोन्ही देशात संबंध बिघडले होते. त्यानंतर भारताने देशव्यापी मॉक ड्रील केली होती आणि त्याच रात्री भारतीय वायूदलाने पाकच्या नऊ अतिरेकी तळांवर हवाई हल्ला केला. त्यानंतर भारताने सहा सीमावर्ती राज्यात आज शनिवारी पुन्हा मॉक ड्रील केली. या मॉक ड्रीलने परत पाकिस्तानच्या हृदयात धडकी भरली आहे.
सीमेवरील जम्मू-कश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि केंद्र शासित प्रदेश चंडीगड या सहा राज्यात शनिवारी मॉक ड्रील झाली. भारत-पाक तणावाचा काळ चालू आहे. जर अशावेळी हवाई हल्ला झाल्यास घ्यावयाची दक्षता आणि वैद्यकीय मदतीच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण शनिवारी झाले. यावेळी सर्व आपात्कालीन यंत्रणेचा प्रतिसाद किती मिनिटात येतो याची रंगीत तालीम करण्यात आली. या मॉकड्रीलचे आयोजन खरे तर २९ मे रोजी होणार होते. परंतू काही प्रशासकीय कारणांनी ती आज शनिवार दि.३१ मे रोजी घेण्यात आले.
७ मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन दहशतवाद चिरडल्यानंतर हा देश भारतावर डुख ठेवून आहे. त्यामुळे भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी आपली तयारी मजबूत करण्यासाठी भारतीय सैन्याने सहा सीमेवरील राज्यात मॉक ड्रील केली. या मोहिमेस ‘ऑपरेशन शील्ड’ असे नाव देण्यात आले आहे. या ‘ऑपरेशन शील्ड’ अंतर्गत, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि जम्मू आणि काश्मीर या ६ सीमावर्ती राज्यांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजित केले गेले. शनिवारी सायं. ५ ते रा. ९ वाजेपर्यंत ही मॉकड्रील करण्यात आली. काही राज्यांमध्ये ब्लॅक आऊट देखील करण्यात आले.
_________________
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!


