Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका ! : पालकमंत्री नितेश राणे. ; देवगड – जामसंडे शहरातील विविध नागरी समस्यांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा.

  • प्रलंबित विकासकामे तात्काळ पूर्ण करा !
  • नाट्यगृह आणि मच्छीमार्केटसाठी जागा उपलब्ध करा !
  • कचरा संकलनासाठी नवीन गाड्या देणार !

कणकवली : पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत आहे. शहराचे वाढते महत्त्व लक्षात घेता विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे. परंतु शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित असून निधी अखर्चित राहिलेला आहे. त्यामुळे प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत. विकासकामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

देवगड जामसंडे नगरपंचायत क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू , मुख्याधिकारी सूरज कांबळे, नगरसेवक शरद ठुकरुल, निवृत्ती तारी, संतोष तारी, प्रणाली माने, मनीषा जामसंडेकर, विश्वनाथ खडपकर, रुचाली पाटकर, आद्या गुमास्ते, नितीन बांदेकर, विशाल मांजरेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की विकासकामे वेळेत पूर्ण का होत नाहीत हे पाहणे देखील महत्त्वाचे असून यापुढे विकास कामांचा नियमित आढावा घ्या. शहरातील प्रलंबित विकास कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाका. शहरातील कचरा संकलन करण्यासाठी नवीन घंटागाडी उपलब्ध करून देण्यात येतील. कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्येला प्राधान्य देऊन त्या तात्काळ सोडवा. त्यांना नियमानुसार वेतन द्या. शहरामध्ये नाट्यगृह उभारण्यासाठी सर्व्हेसह आराखडा बनवून तत्काळ प्रस्ताव सादर करा.तसेच अद्यावत मच्छीमार्केट उभारण्यासाठी देखील जागा प्रस्तावित करा. देवगड शहराने पर्यटन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्याने या पुढील काळात वाहतूक कोंडी मुक्त शहर म्हणून या शहराची ओळख निर्माण होण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. शहरांमध्ये मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनत असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करा. शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे. हा निधी वेळेत खर्च करून विकासकामे पूर्ण करा असेही ते म्हणाले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles