वैभववादी : भाजपाच्या माध्यमातून विविध सेल व मोर्चाच्या वतीने कार्यक्रम होत असताना किसान मोर्चाने ही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचा शुभारंभ वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावात मान्यवरांच्या हस्ते गोमाता पूजनाने झाला . त्यानंतर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .
या कार्यक्रमासाठी अभियानाचे संयोजक सिंधुदुर्ग भाजप उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, वैभववाडी नगराध्यक्षा सौ.श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे , श्री.गुरुनाथ पाटील सरचिटणीस किसान मोर्चा,श्री.महेश संसारे सरचिटणीस किसान मोर्चा, ता.सरचिटणीस रितेश सुतार , संजय सावंत , श्री.अवधूत नारकर किसान मोर्चा मंडळ अध्यक्ष वैभववाडी,श्री.यशवंत पंडित,श्री.अनंत नेवरेकर,श्री.विनोद आयरे,श्री.विलास वळंजू,श्री.सूरज तावडे,श्री.शिवाजी नाटेकर, श्री.मंगेश कदम ,सौ.सुप्रिया तांबे, नेहा माईनकर , सुंदरी निकम, श्री.प्रदीप मोरे,श्री.प्रथमेश कोलते,श्री.उदय सावंत,श्री.अशोक गुरव,श्री.दिनेश सुतार,श्री.संजय सावंत,श्री.रोहित रावराणे,श्री.आनंद गावडे,श्री.शैलेश जामदार,श्री.गंगाराम आडुळकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री.महेश सावंत यांनी गोमाता चे नैसर्गिक शेती मधील महत्त्व विषद केले.
किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री.उमेश सावंत यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली.यानंतर भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रसन्ना देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य शासनाने केलेल्या महिला धोरणा संबंधी माहिती उपस्थितांना दिली.यावेळी बोलताना श्री.प्रसन्ना देसाई यांनी किसान मोर्चा करत असलेल्या जिल्ह्यातील कामांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
यावेळी भाजप किसान मोर्चा कार्यकर्ते श्री.मंगेश कदम यांची आत्मा कमिटी वैभववाडी तालुक्याच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री.प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन किसान मोर्चा च्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री.महेश संसारे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त गोमाता पूजन व नैसर्गिक शेती परिसंवाद ! ; भाजपा किमान मोर्चाच्या वतीने आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


