वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आणि जिल्हा स्तरावरील अनेक विभागातील प्रशा:सकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या प्रश्नांवर कार्यवाही होण्यास व न्याय मिळण्यास विलंब होतो.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ही जिल्हास्तरावरील मिनी विधानसभाच आहे.
या परिषदेचे अशासकीय सदस्य हे सर्वसामान्य ग्राहकांचे प्रतिनिधित्व करीत असतात. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे मिळत नाहीत.
त्यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, सहाय्यक आयुक्त, औषध प्रशासन विभाग आणि उपनियंत्रक, वैद्यमापन शास्त्र सिंधुदुर्ग ही पदे रिक्त आहेत. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक सभा अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होत असते. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मे महिन्याची मासिक सभा दिनांक ३० मे २०२५ रोजी मा.सचिव, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हा पुरवठा अधिकारी याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये अशासकीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या मागील सभेतील मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. परंतु अन्न व औषध आणि वजनमापे संदर्भात प्रश्नांवर अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर फक्त चर्चा झाली. या विभागांशी संबंधित प्रश्न जबाबदार अधिकारी नसल्याने पुढील योग्य कार्यवाही होत नाही.जिल्ह्यातील या दोन महत्त्वाच्या विभागात मा. सहाय्यक आयुक्त, अन्न प्रशासन विभाग व अन्नसुरक्षा अधिकारी तसेच मा. सहाय्यक आयुक्त, औषध विभाग व औषध निरीक्षक तसेच वजनमापे विभागातील मा.उपनिरीक्षक व मा. निरीक्षक ही पदे रिक्त असल्याने या विभागांशी संबंधित बरेच प्रश्न सोडवले जात नाहीत. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची सिंधुदुर्ग जिल्हा शाखा व संस्थेचे अशासकीय सदस्य आणि इतर प्रवर्गातील अशासकीय सदस्यांच्यावतीने अध्यक्ष जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना या परिषदेचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पत्र देऊन वरील पदे भरण्यासंदर्भात विनंतीवजा मागणी केली आहे. या पत्राची प्रत मा.मुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य, अन्न व औषध मंत्री, प्रधान सचिव-अन्न व औषध प्रशासन विभाग व जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नितेश राणे व संस्थेचे अध्यक्ष/ सचिव यांना पाठवली आहे.
जिल्ह्यातील रिक्त पदे तत्काळ भरावीत ! ; ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


