Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

जांभवडे पंचक्रोशीतील नागरिकांच्या सेवेसाठी स्वरा परब यांच्याकडून शवपेटी समर्पित ! ; सामाजिक कार्यकर्ते श्री.वामन तर्फे यांचे प्रयत्न.

कणकवली : जांभवडे पंचक्रोशीतील नागरिकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक वातानुकूलित शवपेटी असावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती.त्यानुसार गरज आणि लोकांची मागणी याचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे यांनी प्रयत्न सुरू केले.प्रयत्न सुरु असताना त्यांचे मित्र आणि स्नेही श्री.सतीश परब,भरणी आगरवाडी , सध्या वास्तव्य अमेरिका यांनी शवपेटी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.आणि त्यांची कन्या कु.स्वरा सतीश परब हीने आपले
पणजोबा कै.संभू तुकाराम परब उर्फ दादा घरटनकार यांच्या स्मरणार्थ जांभवडे पंचक्रोशीतील नागरिकांच्या सेवेसाठी स्वखर्चाने अत्याधुनिक वातानुकूलित शवपेटी देणगी स्वरुपात दिली.सदर शवपेटीचे लोकार्पण कसाल हायस्कूलचे माजी प्राचार्य श्री.गुरुदास कुसगांवकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद माजी सदस्य श्री.लोरेन्स मान्येकर, माजी पंचायत समिती सदस्य श्री.बाळकृष्ण मडव, डॉ.प्रशांत मडव, जांभवडे सरपंच श्री.अमित मडव,घोटगे उपसरपंच श्री.सचिन तेली, श्री.अरुण सावंत, श्री.शिवाजी मडव, श्री.मंगेश बाणे, श्री.सुनिल गांवकर, श्री.श्रीकांत खांडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.श्री.सतीश परब आणि कु.स्वरा परब यांच्यासारखी माणसे परदेशी राहुनही आपल्या मुळ गावावर निष्ठा ठेवून लोकोपयोगी उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य करतात ही बाब फार महत्त्वाची असे उद्गार प्रमुख पाहुणे श्री.कुसगांवकर सर यांनी काढले.डॉ.प्रशात मडव यांनी श्री.सतीश परब आणि कु.स्वरा परब यांच्या दातृत्वाबाबत बोलताना अमेरिकेत वास्तव्यास असूनही आपल्या पंचक्रोशीतील नागरिकांच्या सेवेसाठी आवश्यक असलेली शवपेटी देऊन सहकार्य केले हे एक त्यांचे महान सामाजिक कार्य आहे असे मनोगतातून सांगितले.व यासाठी श्री.वामन तर्फे यांनी यासाठी पुढाकार घेऊन विशेष प्रयत्न केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.या वेळी जिल्हा परिषद माजी सदस्य श्री.लोरेन्स मान्येकर यांनीही मनोगत व्यक्त केले.आपल्यावर विश्वास दाखवून परब कुटुंबियांनी लोकोपयोगी उपक्रमासाठी संपूर्ण आर्थिक सहाय्य केले त्याबद्दल श्री.वामन तर्फे यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.डाॅ.प्रशांत मडव यांनी आपल्या दवाखान्यात शवपेटी ठेवण्याची तयारी दर्शवली यामुळे हा उपक्रम राबविता आला.याबाबत श्री.वामन तर्फे आणि उपस्थितांनी डॉ.मडव यांचे विशेष आभार मानले.
यावेळी श्री.बाळा आरवारी, श्री.प्रवीण मडव,श्री.नयन मडव, श्री.सीताराम चव्हाण गुरुजी, श्री.प्रथमेश पावसकर, श्री.विनायक ढोकरे, श्री.संदिप मेस्त्री, श्री.तेजस भोगले आरोग्य सेवक श्री.शिवराम तवटे व इतर नागरिक उपस्थित होते.जांभवडे सरपंच श्री.अमित मडव यांनी आभार प्रदर्शन करताना ही सेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल परब कुटुंबियांना धन्यवाद दिले आणि ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.
ही शवपेटी उपलब्ध होण्यासाठी डॉ.प्रशांत मडव श्री.शिवाजी मडव,कणकवली येथील उद्योजक श्री.नंदु उबाळे, श्री.आपटे, श्री.वामन तर्फे यांचे चिरंजीव श्री.मयूर तर्फे यांचे सहकार्य लाभले.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles