Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडी येथील बांदेकर कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठात चमक ! ; महाविद्यालयासाठी अभिमानास्पद क्षण!

सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या बी.एफ.ए. (अप्लाइड आर्ट) शाखेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, बी. एस. बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडीने यंदा आपल्या उत्तुंग कामगिरीने विद्यापीठ पातळीवर भरीव असा ठसा उमटविला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विविध नामांकित महाविद्यालयांतील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये बांदेकर महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पहिल्या ११ गुणवंतांमध्ये स्थान मिळवत संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे.
यात मांजरेकर प्रियांशु अनंत नेहा सातवा,
पाटकर उन्मेष मोहन रुक्मिणी नववा आणि
सावंत महादेव प्रदीप पुष्पलता अकरावा या विद्यार्थ्यानी बीएफए च्या अंतिम परीक्षेत आपली चमक दाखविली. या विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत, कलात्मक कौशल्य आणि शैक्षणिक निष्ठा यांचे हे मूर्त उदाहरण असून, त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयातील मार्गदर्शन, वातावरण व गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या सर्वांना प्राचार्य उदय वेले, प्रा. सिद्धेश अनिल नेरुरकर, प्रा. राधा गावडे, प्रा. तुकाराम आत्माराम मोरजकर, प्रा. चेतन जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.
यावर्षी अंतिम परीक्षेस बसलेल्या २७ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, १८ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी प्राप्त झाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. उदय वेले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करताना सांगितले, की “विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या मेहनतीचेच नव्हे, तर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सर्जनशील वातावरणाचे, आधुनिक पायाभूत सुविधांचे आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे फलित आहे.” यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश भाट, संस्थापक सदस्य, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या अद्वितीय यशामुळे बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाने जे. जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट, रचना संसद, विवा इन्स्टिट्यूट, व वसंतदादा पाटील कॉलेज यांसारख्या मुंबईस्थित अग्रगण्य संस्थांमध्ये आपले स्थान अधिक बळकट केले आहे. महाविद्यालय भविष्यातही दर्जात्मक शिक्षण, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
अधिक माहिती साठी संपर्क :
प्रा. उदय वेले – प्राचार्य
बी. एस. बांदेकर कला महाविद्यालय (अप्लाइड आर्ट), सावंतवाडी
०२३६३-२७५३६१

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles