Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा निश्चितच सुधारेल ! : आ. दीपक केसरकर.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा निश्चितच सुधारेल, असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आपण केलेल्या पाठपुराव्याने तीन स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश निघाल्याची माहिती त्यांनी दिली.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात स्पेशालिस्ट डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. हार्ट फिजीशीयन द्यावा अशी मागणी मी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. तोवर ऑनकॉल पद्धतीने दोन फिजीशीयन येथे सेवा देत आहेत. लवकरच आणखीन डॉक्टर जिल्ह्यात उपलब्ध होऊन आरोग्य स्थिती सुधारेल, असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, कमलाकर ठाकूर, महेश पालव आदींसह शिक्षक, पालक, शिक्षण प्रेमी उपस्थित होते.

दरम्यान, राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडील जमीनीचा परिस्थितीचा अहवाल घेऊन भागाची पहाणी पुणे येथील कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता करणार आहेत. या घटनेच गंभीर्य लक्षात घेत अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. या पुतळ्याचा पाया मजबूत आहे. त्यामुळे काहीही होणार नाही याची मला खात्री आहे. आजूबाजूला टाकलेली भर सुद्धा खचणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती. याबाबत संबंधित विभागाला कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतली जाईल असं मत आम. केसरकर यांनी व्यक्त केले. तसेच पुर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक अशा तीन स्तरांत शाळा चालवल्या जाणार आहेत‌. नवीन शैक्षणिक धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानं मुलांना चांगलं शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे देशाच भवितव्य घडवणारे विद्यार्थी निर्माण होतील, असा विश्वास माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय मुलांच्या स्वागत सोहळ्यानंतर ते बोलत होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles