सावंतवाडी : शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा व त्याचा नागरिकांना होणारा त्रास पाहताच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये जाऊ नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराचा पोलखोल करून मुख्याधिकाऱ्यांन सहित संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं.त्यानंतर साळगावकरांकडून दहा दिवसाचा अल्टिमेट नगरपरिषदेला देण्यात आला होता.
दहा दिवसानंतर साळगावकर यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या कामकाजाबाबत पुन्हा नाराजी व्यक्त केली. काही प्रमाणात शहरांमध्ये स्वच्छता दिसते परंतु अजूनही ‘अस्वच्छता आणि खड्डे जसे थे’ आहे. या बाबत साळगावकरांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व दोन दिवसांत रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास नगरपरिषदेवर पुन्हा धडक देऊ असा इशारा दिला असता दोन दिवसात काम सुरू होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून साळगावकर यांना सांगण्यात आले.
ADVT –



