Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

इन्सुली येथील विहिरीत पडलेल्या दुर्मिळ खवले मांजराला जीवदान !

बांदा : इन्सुली- खामदेव नाका येथील विहिरीत पडलेल्या दुर्मिळ खवले मांजराला वनक्षेत्रपाल सावंतवाडी सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू करून जलद कृती दलाच्या सहकार्याने व स्थानिकांच्या मदतीने जीवदान मिळाले.
सविस्तर वृत्त असे की,इन्सुली – खामदेव नाका येथील महामार्ग लागतच निलेश सावंत यांच्या घराजवळील विहिरीत बुधवार दी १८ जुन २०२५ रोजी दुर्मिळ असे खवले मांजर पडल्याचे सावंत यांच्या घरातील सदस्यांना निदर्शनास आले.दरम्यान निलेश सावंत यांनी याबाबतची माहिती तात्काळ बांदा वन विभागाला दिली.


यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर,पत्रकार निलेश मोरजकर,गुरी कल्याणकर यांनी खवले मांजराला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.
वन विभागाच्या जलद कृती दलाचे बबन रेडकर,शुभम कळसूलकर,राकेश अमरूसकर, तांबोळी वन रक्षक सुयश पाटील,गजानन सकत,विठोबा बांदेकर आदी या रेस्क्यू मध्ये सामील होते.
सदर खवले मांजराला रात्री उशिरा सावंतवाडी येथील वन विभागाच्या कार्यालयात नेऊन त्याची वैदयकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles