सिंधुदुर्गनगरी : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 24 जून ते 14 जुलै 2025 या कालावधीमध्ये तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा 24 जून ते 8 जुलै 2025 या कालावधीमध्ये सुरु होणार आहेत. तसेच 15 व 16 जुलै 2025 रोजी ऑनलाईन परिक्षा होणार आहे. जिल्ह्यामध्ये इ. 10 वी च्या परिक्षेसाठी 02 परिक्षा केंद्रे आहेत तर इ. 12 वी च्या परिक्षेसाठीही 02 परिक्षा केंद्रे आहेत. इ. 10 वी च्या परिक्षेसाठी एकूण 46 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत तर इ. 12 वी च्या परिक्षेसाठी एकूण 63 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.
कॉपीमुक्त परिक्षा होण्यासाठी जिल्हास्तरावर एकूण 2 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथाकांमध्ये जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (योजना) आणि प्राचार्य (डाएट) यांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये 2 परीरक्षक केंद्र (कस्टडी) आहेत. ही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी पुढीलप्रमाणे सूचना दिल्या.
परीक्षा केंद्रांचे कामकाज सुव्यवस्थित चालावे यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परीरक्षक केंद्र, मुख्यकेंद्र व उपकेंद्र यांच्या 100 मीटर परीसरात पोलिस अधिनियम 37 (1) (3) व 144 कलम लागू करण्याबाबत कार्यवाही करावी. परिक्षा केंद्रांच्या परिसरात एस.डी.टी. बुथ फॅक्स व झेरॉक्स मशिन परिक्षा केंद्रांमध्ये मोबाईलचा वापर इत्यादींवर, नियंत्रणाचे दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत. परिक्षा कालावधीमध्ये वीज वितरण कंपनी, एस. टी. महामंडळ, पोलिस यंत्रणा, पोस्ट ऑफीस कार्यालये इ. विभागांनी दक्ष राहावे. वीजवितरण कंपनीने परिक्षा कालावधीत भारनियम न करण्याबाबत व वीज पुरवठा सुरळीतपणे चालू ठेवावा. एस.टी महामंडळाने परीक्षा कालावधीत शाळांच्या मागणीनुसार गाड्या वेळेवर सोडाव्यात. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कलम 37 (1) (3) चे फलक दर्शनी भागात लावावेत, सर्व तहसिलदारांनी परीक्षा सुरळीत चालणे व कॉपीमुक्त अभियान राबवीण्याबाबत कार्यवाही करावी. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षे पूर्वी इमारत वर्ग खोल्या, स्वच्छता गृहे, परिसर यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. स्वच्छता गृहामध्ये साबण, हँडवॉश ठेवण्यात यावेत. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थांची कॉपी मुक्त अभियानांतर्गत तपासणी करण्यात यावी व विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतर ठेवावेत. सर्व परिक्षा केंद्रसंचालकांनी दक्ष राहून आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा. परिक्षेबाबत स्थानिक आरोग्य यंत्रणेनेही परीक्षा केंद्रावर आरोग्य कर्मचारी उपस्थित ठेवावेत. परीक्षा केंद्रसंचालकांनी वर्ग खोल्यामध्ये स्वच्छता, पुरेशा व सुरक्षित बैठक व्यवस्था, लाईट व पंखा यांची व्यवस्था याबाबत परीक्षेपुर्वी सुनियोजन करावे, परीक्षा तणवमुक्त व सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा कालावधीमध्ये सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे व कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रशासन सज्ज !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


