Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

शिक्षक, कवी रामा पोळजी यांचा भाजपाच्या वतीने सत्कार ! ; ग्रंथालय पुस्तक निर्मितीसाठी श्री. पोळजी यांच्या ‘रंग मनाचे’ या कवितासंग्रहाची राज्यस्तरावर निवड.

वेंगुर्ल : तालुक्यातील जि. प. शाळा मठ कणकेवाडीचे उपक्रमशील शिक्षक व कवी रामा वासुदेव पोळजी यांच्या ‘रंग मनाचे’ या कवितासंग्रहाची समग्र शिक्षा अंतर्गत राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य आत्मसात होण्याकरता त्यांच्या अनुभवाशी नाते जोडणारी पुस्तके पूरक वाचनासाठी उपलब्ध करून द्यावीत या करता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यावतीने पुस्तक निर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यासाठी राज्यातील शिक्षण विभागातील सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांना पुस्तक लिहिण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनास अनुसरून येथील मठ कणकेवाडी ता. वेंगुर्ले या शाळेतील उपक्रमशील शिक्षक रामा पोळजी यांनी आपले ‘रंग मनाचे’ हे पुस्तक सादर केले होते. जिल्हास्तर व राज्यस्तर परीक्षणातून या पुस्तकाची, समग्र शिक्षा २०२४-२५ योजनेच्या ग्रंथालय योजनेसाठी अंतिम निवड करण्यात आली.

पुस्तकांचे वाचन करणे म्हणजे सर्जनशीलतेच्या वाटेने चालणे असते. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या जडणघडणीच्या वयापर्यंत वाचनाची अभिरुची निर्माण झाली तर पुढे तो वाचन संस्कार कायम राहतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी पुस्तके लिहून ती राज्य शासनाकडून प्रकाशित करून सर्व शाळापर्यंत पोहोचवण्याचा देशभरातील पहिलाच उपक्रम असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

रामा पोळजी हे बालसाहित्य चळवळीत काम करणारे शिक्षक व कवी असून, त्यांना त्यासाठी यापूर्वी नगरवाचनालय वेंगुर्लेसह अनेक महत्त्वाचे आदर्श शिक्षक व साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत .
भाजपा नेही त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई व अँड. सुषमा खानोलकर , मा.तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ , वृंदा गवंडळकर , वृंदा मोर्डेकर , आकांक्षा परब इत्यादी उपस्थित होते .

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles