Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

चिपळूण प्लास्टिक मुक्त करण्यासाठी अभिनेता ओंकार भोजनेच्या उपस्थितीत मोहीम! ; दोन तासात ६.२७९ टन कचरा संकलित.

चिपळूण : शहराच्या पूरमुक्तीकरीता जे छोटे मोठे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत त्यापैकी एक म्हणजे प्लास्टिक संकलन मोहीम. अभिनेता ओंकार भोजने याच्या उपस्थितीत पूराच्या पाण्यासोबत वाहत जाऊन नाले व गटारे यामध्ये अडकणारा प्लास्टिक कचरा, बाटल्या, रॅपर्स व इतर कचरा यांची संकलन मोहिम आज चिपळूण शहरामध्ये राबविण्यात आली.


या मोहिमेत १३ शाळा, सर्व शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था व नागरिक यांचेसह २५०० ते ३००० लोक सहभागी झालेले होते. कचरा संकलन व जनजागृती या दोन उद्देशाने केलेल्या या संकलन मोहिमेत आज शुक्रवारी सकाळी ८ ते १० या वेळेत ६.२७९ टन इतका कचरा संकलित करण्यात आला.

६२७९ किलो कचऱ्याचे वर्गीकरण –
१) प्लास्टिक पिशव्या व रॅपर्स- १२२७ किलो
२) काचेच्या बाटल्या- २३५५ किलो
३) प्लास्टिक बाटल्या- १७२२ किलो
४) कापडी पिशव्या व कापड- ८२० किलो
५) थर्माकॅाल- १५५ किलो
गोळा करण्यात आला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles