सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेचा यशस्वी पाठपुरावा.
वेंगुर्ला : तालुक्यातील तुळस येथील प्रल्हाद केशव राणे हे पेशंट बांबोळी,गोवा येथे ॲडमिट होते त्यांना एबी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या चार बॅग्सची तातडीची गरज होती.
यावेळी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेशी रुग्णाच्या नातेवाईकांनी संपर्क साधला असता, बांबोळी (GMC) रक्तपेढीतून दी.२३ जुन २०२५ रोजी सर्व ४ बॅग्सची पूर्तता करण्यात आली.
यावेळी किशोर भगत (वय – ३२) व अजित राणे (वय – २८) यांनी समय सूचकता ठेऊन अमूल्य रक्तदान केले.ही पोस्ट पूर्ण करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष महेश राऊळ व विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांनी मोठे सहकार्य केले.नातेवाईकांनी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेचे आभार मानले.


